
घर, कार, मोबाईल आदी खरेदी करण्यासाठी ईएमआय हा सर्वात सोपा पर्याय आहे; पण कधी मोठी रक्कम हातात आली की कर्ज फेडावे हा विचार मनात येते.
याला लोन फोरक्लोजर किंवा प्रीपेमेंट म्हणतात. कर्जाची उरलेली रक्कम एकदम फेडणे हे नेहमीच आर्थिकदृष्टय़ा फायद्याचे असते असे नाही. तोटाही होऊ शकतो.
कर्ज सुरुवातीच्या टप्प्यात असेल आणि तुम्ही मोठी रक्कम फेडली तर फायदा होतो. कर्ज संपायला एक-दोन वर्षे शिल्लक असतील तर प्रीपेमेंट करू नका.
काही बँका फोरक्लोजर चार्जेस लावतात. त्यामुळे आर्थिक नुकसान होते. कर्जावर आयकराची सवलत मिळते. गृहकर्ज लवकर फेडले की ही सवलत मिळत नाही.
अतिरिक्त पैसे असतील आणि बँका चार्जेस आकारत नसतील तर कर्जमुक्त होणं कधीही चांगले. पण टॅक्स बेनिफिट आणि गुंतवणुकीचा परतावा याचाही विचार करा.




























































