अकरा वर्षांनंतर धनंजय मुंडे गोपीनाथ गडावर

जीवनात संघर्ष करून स्वतःच्या पायावर उभे राहताना ज्यांनी ज्यांनी साथ दिली त्या सर्वांचे आभार… गोपीनाथ गडावर बोलताना राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे भावुक झाल्या. अकरा वर्षांनंतर दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे गोपीनाथ गडावर एकत्र आले. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने परळीतील गोपीनाथ गडावर विविध सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आले होते. अकरा वर्षांनंतर पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे गोपीनाथ गडावर एकत्र आले. या वेळी धनंजय मुंडे काय बोलणार याकडे राज्याचे लक्ष लागले होते. परंतु त्यांनी सगळय़ांच्या वतीने आपण बोलावे असे धनंजय मुंडे यांनी सांगितल्याचे पंकजा म्हणाल्या.