
धनुर्वात, डांग्या खोकला आणि घटसर्प या आजारावरील अत्यंत बहुगुणी त्रिगुणी लस तयार करणारी हाफकीन बायो फार्मास्युटिलक लिमिडेट खासगी पंपनीला देण्याचा डाव आखल्याचा गंभीर आरोप कामगार संघटनेने केला आहे. हा डाव साधण्यासाठीच लसीचा फॉर्म्युला देण्यासाठी निविदाही मागवल्याचे कामगार संघटनेने म्हटले आहे.
गोरगरीबांना वरदान ठरणाऱ्या धनुर्वात, डांग्या खोकला आणि घटसर्पावरील अत्यंत प्रभावी लसीची निर्मिती परळच्या हाफकिन बायो फार्मा पंपनीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने स्टेन सीड (लसीचे संयुग) हाफकिनला सुपूर्द केला आहे. धनुर्वात, डांग्या खोकल्याच्या विषाणूंपासून ही लस तयार केली जाते. हे विषाणू हाताळण्याची परवानगी फक्त हाफकीन फार्मालाच आहे. ब्रिटिश काळांपासून हे दुर्मिळ आणि अमुल्य कल्चर हाफकिनमध्ये जपून ठेवले आहे. आंतराष्ट्रीय बाजारात या कल्चरची किंमत जवळजवळ एक हजार कोटी रुपये आहे. हा अमूल्य ठेवा खासगी संस्थेला दिल्यानंतर टप्प्याटप्प्याने संपूर्ण हाफकीनच खासगी संस्थेच्या घशात घालण्याचा डाव असल्याचा आरोप हाफकीन बायो फार्मास्युसिटक कॉर्पोरेशन एम्प्लॉईज युनिनयचे अध्यक्ष गोविंदराव मोहिते यांनी केला. केला. तर स्टेन सीडच्या स्वरूपातील शासनाचा मौल्यवान ठेवा खासगी पंपनीच्या ताब्यात देण्यापेक्षा शासनाने आवश्यक निधी उपलब्ध करून पुन्हा लस निर्मिती निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी हाफकीन जीव औषधनिर्माण महामंडळ मर्यादितचे संचालक दीपक पेडणेकर यांनी केली आहे. दरम्यान, त्रिगुणी लसीचा फॉर्म्युला विकाला जाणार नसून अद्याप कोणतीही प्रक्रिया अंतिम झाली नसल्याचे हाफकीन महामंडळचे व्यवस्थापकीय संचालक सुनील महिंद्रकर यांनी सांगितले आहे.

























































