ड्रेस कोडवरून कर्मचाऱ्यांचा स्टारबक्सविरुद्ध खटला

स्टारबक्सच्या नव्या ड्रेस कोडवरून कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष भडकला आहे. अमेरिकेच्या तीन राज्यांतील कर्मचाऱ्यांनी कंपनीविरोधात खटला दाखल केला आहे. कंपनीने नवीन ड्रेस कोड लागू केला आहे, परंतु ड्रेससाठीचे पैसे देण्यास नकार दिला आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. हे खटले इलनॉल आणि कोलोराडोच्या न्यायालयात दाखल करण्यात आले आहे. स्टारबक्स कर्मचाऱ्यांचा नवीन ड्रोस कोड अंतर्गत काळ्या रंगाचा शर्ट व खाकी, काळी किंवा निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट घालणे बंधनकारक केले आहे. कर्मचाऱ्यांना केवळ बुटासाठी 60 डॉलर खर्च करावे लागत आहेत.