
सामना ऑनलाईन । अनंतनाग
जम्मू-कश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील कोकेर्नाग भागात हिंदुस्थानचे लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये पहाटेपासून चकमक सुरू आहे. या चकमकी दरम्यान एका दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आलं आहे. आणखी दोन दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळत आहे.
ईदनंतर कश्मीर खोऱ्यात फुटिरतावाद्यांनी जवानांवर केलेली दगडफेक लक्षात घेता लष्करानं सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली आहे. तसेच दहशतवाद्यांच्या विरोधातील कारवायांचा वेग वाढवला आहे. कोकेर्नाग भागात काही दहशतवादी लपले असल्याची माहिती लष्कराला मिळाल्यानंतर त्या भागाला घेरण्यात आलं. मात्र दहशतवाद्यांनी समर्पण करण्याऐवजी गोळीबार केला. त्यानंतर लष्करानं देखील त्याला जोरदार प्रत्त्युत्तर दिलं.
#UPDATE: Body of a terrorist recovered, encounter continues between security forces and terrorists in Anantnag’s Kokernag. 3 terrorists are reportedly trapped. #JammuAndKashmir https://t.co/33mthciFq8
— ANI (@ANI) August 24, 2018

























































