आजपासून ऊर्जा सप्ताह

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

महाऊर्जाच्या वतीने 14 डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानुसार महाऊर्जाने उद्या मंगळवारपासून 14 ते 20 डिसेंबर दरम्यान ऊर्जा संवर्धन सप्ताहाचे आयोजन केले आहे. त्यानुसार सर्वसामान्यांमध्ये ऊर्जा संवर्धनाबाबत जनजागृती व्हावी म्हणून ऊर्जा संवर्धन रथ तयार केला असून त्याचे उद्घाटन सकाळी 10. 30 वाजता ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते त्यांच्या पर्णकुटी या शासकीय निवसस्थानी होणार आहे.