ईडीने नोंदवले 5158 गुन्हे, फक्त 43 प्रकरणे निकाली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मागील काही वर्षांत कमालीच्या सक्रिय झालेल्या सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) सहा वर्षांत तब्बल 5158 वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहेत. मात्र, आतापर्यंत त्यातील केवळ 43 प्रकरणे निकाली निघाली आहेत.

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी राज्यसभेत एका लेखी उत्तरात ईडीच्या कासवछाप कारभाराची कबुली दिली आहे. समाजवादी पक्षाचे खासदार रामजी लाल सुमन यांनी या संदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर चौधरी यांनी मागील सहा वर्षांची आकडेवारी दिली. स्थापना झाल्यापासून ईडीने आतापर्यंत एकूण 8391 गुन्हे दाखल केले आहेत. त्यातील तब्बल 5,158 गुन्हे फक्त मागच्या सहा वर्षांतील आहेत.