
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध घरच्या मैदानावर पहिल्या एकदिवसीय सामन्यात लाजीरवाणा पराभव पत्करावा लागल्यानंतर इंग्लंड संघावर टीकेची झोड उठू लागली आहे. इंग्लंडच्या एकाही फलंदाजाने संयमाने खेळी केली नाही. त्यामुळे संघाची कामगिरी अत्यंत खराब झाली. सर्वच फलंदाजांनी खराब फटके मारून आपली विकेट फेकली, अशा शब्दांत इंग्लंडचे माजी फलंदाज मार्क बुचर यांनी इंग्लंड संघाची खरडपट्टी केली आहे.
लीड्स येथील यॉर्कशायर क्रिकेट मैदानावर झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडचा 7 विकेट राखून पराभव करत तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेची दणक्यात सुरुवात केली.