निक जोनस कॉन्सर्टमध्ये जीवाच्या भीतीने धावत सुटला! नेमकं काय घडलं?

एक इंस्टाग्राम युजर्स ने शेअर केलेल्या क्लिपमध्ये निक जोनस कॉन्सर्टमध्ये जिवाच्या भितीने धावताना दिसत आहे. नक्की काय झालं कॉन्सर्टमध्ये? हा प्रश्न सर्व चाहत्यांना पडलेला आहे.

सध्या अशाच एका कॉन्सर्टची जोरदार चर्चा ,सुरु आहे. प्रागमध्ये झालेल्या एका निक जोनसच्या या कॉन्सर्टमध्ये झालेल्या एका घटनेचे सोशल मिडियावर अनेक व्हिडिओ समोर आले आहेत. चालू कॉन्सर्टमध्ये निक जोनस स्टेजवरून पळाल्याचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर सध्या चांगलाच गाजत आहे. जोनस डेली न्यूजच्या एका इंस्टाग्रॅम वापरकर्त्यानं शेअर केलेल्या या क्लिपमध्ये निक जोनस प्रेक्षकांकडे पाहतो आणि अचानक धावताना दिसत आहे.आणि स्टेजवरून उतरताना सोबतच जवळच उभ्या असणाऱ्या त्याच्या सुरक्षारक्षकालाही तो हातवारे करतो आणि दोघोही मंचावरून कॉन्सर्टच्या मधूच धावत सूटतात. तर,दुसऱ्या एका व्हिडिओक्लिपमध्ये चालू कॉन्सर्टमध्ये निकला कोणीतरी लेझर मारत असल्याचं दिसल्यानंतर तो धावत गेल्याचे दिसले. दहा मिनिटे हा कॉन्सर्ट थांबवण्यात आला. आणि त्या व्यक्तीला घटना स्थळावरून हलवण्यात आले.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Jonas Daily News (@jonasdailynews_)

हा सारा प्रकार नेटकऱ्यांना चांगलाच उचलून धरलाय. धडकी भरवणारा आणि भितीदायक घटना असल्याचं त्याच्या चाहत्यांनी म्हटलंय.या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर चाहत्यांनी कॉन्सर्टच्या सुरक्षिततेकडे लक्ष वेधलं आहे.