अभिनेता रितेश देशमुखने मराठी सोबतच बॉलीवूडमध्येही त्याच्या वेगवेगळ्या चित्रपटांनी आणि दमदार भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली आहे. त्याच्या वेड चित्रपटाने पूर्ण महाराष्ट्राला वेड लावले होते. मराठी आणि हिंदी माध्यमांसोबतच रितेश आता ओटीटीवर झळकणार आहे आणि विशेष म्हणजे या चित्रपटात अभिनेत्री प्रिया बापटही दिसणार आहे.
रितेश देशमुख आणि प्रिया बापट या जोडीची ऑनस्क्रिन केमिस्ट्री आता बॉलीवूडमध्ये पाहायला मिळणार आहे. नात्यांचा ‘विस्फोट’ हा चित्रपट येत्या 6 सप्टेंबरला जिओ सिनेमावर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अनेक मराठी कलाकार दिसून येणार आहेत.
क्राईम थ्रिलर असलेल्या या सिनेमात प्रेमात झालेला विश्वासघात, चुकिचा मार्ग निवडल्यावर होणारा त्रास या चित्रपटात दाखवण्यात आल्या आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये प्रिया बापटचा बोल्ड अंदाज, त्याचबरोबर रितेश आणि प्रियाची अनोखी प्रेमकहाणी पहायला मिळणार आहे.
View this post on Instagram
ओटीटीवर प्रदर्शित होणाऱ्या ‘विस्फोट’ चित्रपटाचे निर्माते संजय राजप्रकाश गुप्ता आणि अनुराधा लेखी गुप्ता आणि कूकी गुलाटी यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. रितेश देशमुख आणि प्रिया बापट यांच्यासह महेश मांजरेकर, सीमा बिस्वाल, जिशु सेनगुप्ता, शीबा चढ्ढा, रोहित रॉय, रिद्धी डोगरा, पूर्णेंदू भटाचार्य, पार्थ सिद्धपुरा यांचीनी भूमिका केलेली आहे.