मुंबईत स्वत:चं घर घेणं प्रत्येकाचं स्वप्न असतं. त्यासाठी म्हाडांच्या घराच्या लॉटरीकडे अनेकांचं लक्ष असतं. काही दिवसांपूर्वी म्हाडाने मुंबईत अनेक ठीकाणी 2030 घरांची लॉटरीची घोषणा केली आहे. येत्या 8 ऑक्टोबरला यशवंतराव चव्हाण सेंटरला घरांसाठी लॉटरी काढण्यात येणार आहे. अनेक कलाकारांनीही घरासाठी अर्ज केले आहेत.
म्हाडाच्या घरांसाठी अनेक राजकारणी आणि कलाकारांनी अर्ज केले आहेत. प्रसिद्ध लेखक आणि दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी, किशोरी वीज तसेच गौतमी देशपांडे आणि निखील बने यांनीही अर्ज केले आहेत. म्हाडाने अर्ज केलेल्या अर्जदारांची यादी 27 तारखेला जाहीर केली. यामध्ये साधारण 13 लाखांपैकी 500 पेक्षा जास्त अर्ज नाकारण्यात आले. आणि या नाकारलेल्या अर्जांमध्ये संस्कृती बालगुडेचाही समावेश आहे.
गोरेगाव भागात कलाकार गटासाठी फक्त दोन घरे आहेत. मात्र या दोन घरांसाठी 27 कलाकारांनी अर्ज केले आहेत. यासोबतच प्रसिद्ध अभिनेत्री संस्कृती बालगुडे हिने म्हाडाच्या कलाकार कोटामधून तिने हा अर्ज केला होता. पण कलाकार प्रमाणपत्र अवैध ठरल्याने तिचा अर्ज नाकारला गेला.
मुंबईतील म्हाडाच्या घरांच्या लॉटरीची घोषणा झाल्यानंतर 09 ऑगस्ट 2024 पासून अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. मुंबई उपनगरांमधील पहाडी गोरेगाव, अँटॉप हिल-वडाळा, कोपरी पवई, कन्नमवार नगर, विक्रोळी, शिवधाम कॉम्प्लेक्स-मालाड इ. गृहनिर्माण प्रकल्पामधील विविध उत्पन्न गटातील 2 हजार 30 घरे विक्रीसाठी तयार आहेत.