पर्यावरण संवर्धनासाठी अक्षयला ‘गोल्डन ग्लोब’

पर्यावरणासंबंधी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल बॉलीवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमार याला ’गोल्डन ग्लोब ऑनर्स फाऊंडेशन’तर्फे सन्मानित करण्यात येणार आहे. अक्षयसोबत हॉलीवूड अभिनेता लिओनार्दो दी कॅप्रिओ, एमा वॅटसन आणि सारा मार्गारेट क्वाले यांचाही या यादीत समावेश आहे. बॉलीवूडचे सेलिब्रेटी अभिनयासोबत सामाजिक उपक्रमांत देखील सहभागी होत असतात. अक्षय कुमार हा स्वच्छतेच्या प्रश्नाबाबत लोकांना जागृत करीत असतो, प्रोत्साहन देत असतो. तर हॉलीवूड अभिनेता लिओनार्दो दी कॅप्रिओ हा जैवविविधता आणि जंगलांच्या संवर्धनासाठी तसेच हवामान बदलाच्या प्रश्नांवर काम करतो.

आपली प्रतिक्रिया द्या