सहा कोटी पीएफधारकांना दिवाळीचा बोनस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कर्मचारी भविष्य निधी संघटनेच्या (ईपीएफओ) सहा कोटींपेक्षा अधिक सदस्यांच्या खात्यावर लवकरच व्याजाची रक्कम जमा होणार आहे. पीएफधारकांना 8.65 टक्के व्याजदराने रक्कम मिळणार आहे. सुमारे 54 हजार कोटींचे एकूण व्याज दिले जाणार आहे. याबाबतची अधिसूचना काढल्याची माहिती कामगार मंत्री संतोष गंगावर यांनी दिली आहे.

2018-19 या आर्थिक वर्षात पीएफच्या दरात केंद्र सरकारने 0.10 टक्के वाढ केली. त्यामुळे क्याजदर 8.55 टक्क्यांवरून 8.65 टक्के इतका झाला.दिवाळीच्या तोंडावर सरकार नोकरदार वर्गाला खूशखबर देत व्याजाची सर्व रक्कम पीएफधारकांच्या खात्यावर जमा करण्याची शक्यता आहे. एसएमएस (SMS)द्वारे तुम्ही खात्यावर किती रक्कम आहे त्याची माहिती घेऊ शकता.

2018-19 या कालावधीत ईपीएफओच्या 6 कोटी लाभधारकांना 8.65 टक्के क्याजदर मिळणार आहे. सध्या ईपीएफवर दिला जाणारा व्याजदर हा कोणत्याही शासकीय योजनेपेक्षा जास्त आहे.
ईपीएफओच्या वेबसाईटवर, ईपीएफओच्या ऍपवर, एसएमएसच्या माध्यमातून किंका नोंदणीकृत मोबाईलवरून 011-22901406 या क्रमांकावर मिस कॉल देऊन पीएफचा बॅलेन्स तपासता येतो.