ही तर त्यांच्या नैतिकतेच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी बाब, पवन खेरा यांची केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांच्यावर टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

काँग्रेसचे नेते पवन खेऱा यांनी केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांच्यावर टीका करत एपस्टीन प्रकरणाचा मुद्दा उपस्थित केला आहे. खेऱा म्हणाले की, हरदीप पुरी यांनी असे विधान केले होते की, आमच्यापैकी काहींना एपस्टीनचा गुन्हेगारी रेकॉर्ड असल्याबाबत संशय होता.

खेऱा यांनी सांगितले की, 2008 मध्येच एपस्टीनने न्यायालयात आपला गुन्हा कबूल केला होता आणि त्याला शिक्षा देखील झाली होती. त्यामुळे त्याच्या गुन्ह्यांबाबत कोणताही संशय राहण्याचे कारण नव्हते, असे त्यांनी नमूद केले.

त्यांच्या मते, एपस्टीनने गुन्हा कबूल केल्यानंतरही 2014 मध्ये हरदीप पुरी यांच्या मनात संशय होता, हे त्यांच्या नैतिकतेच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे. असा व्यक्ती मंत्रीपदावर असताना त्यांना योग्य कसे ठरवता येईल, असा सवालही खेऱा यांनी उपस्थित केला.