माजी नगरसेवक मनोज संसारे यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वडाळय़ातील माजी नगरसेवक, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख मनोज संसारे यांचे आज प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन भाऊ असा परिवार आहे. उद्या वडाळा पूर्व येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.  मनोज संसारे वडाळा पूर्व कोरबा मिठागर प्रभागातून दोन वेळा अपक्ष म्हणून निवडून आले. ते आंबेडकरी चळवळीतील नेते होते. नामदेव ढसाळ यांच्यासह अनेक नेत्यांबरोबर त्यांनी चळवळीत सक्रिय सहभाग घेतला होता. मात्र गेल्या वर्षभरापासून ते आजारी होते. त्यांच्या निधनाने राजकारणासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी शोक व्यक्त केला.