धारूर हादरले, माजी नगराध्यक्षांच्या पतीची डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या

2341

सामना प्रतिनिधी । बीड

किल्ले धारुर येथील माजी नगराध्यक्षा सविता शिनगारे यांचे पती नामदेव शिनगारे यांची निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना सोमवारी सायंकाळच्या सुमास घडली. या घटनेने धारूरमध्ये खळबळ उडाली आहे

नामदेव शिनगारे यांच्या डोक्यात दगड घालून त्यांचा खून करण्यात आला आहे. धारुर शहरापासून एक किलोमीटर अंतरावर नामदेव शिनगारे यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत आढळून आला. जुन्या आर्थिक वादातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. नामदेव शिनगारे यांच्यासोबत असलेला एकजण गंभीर जखमी झाला आहे. गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरु आहे. घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या