नरेंद्र पाटील यांचा अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचा राजीनामा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र पाठवून महामंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा स्वीकारण्याची विनंती केली आहे.

मराठा क्रांती मोर्चानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ पुनरुज्जीवित करत नरेंद्र पाटील यांची महामंडळाच्या अध्यक्षपदावर 4 सप्टेंबर 2018 रोजी नियुक्ती केली होती. सातारा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविल्यामुळे लोकसभा निवडणुकीदरम्यान पाटील यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर 10 जून 2019 च्या शासन निर्णयाद्वारे नरेंद्र पाटील यांची परत महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती.