
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित परीक्षांच्यावेळी दिव्यांग उमेदवार संगणक प्रणालीवर आधारित परीक्षा देण्यास सक्षम नसल्यास त्यांच्या मागणीप्रमाणे सहायक तसेच अन्य सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या अनुषंगाने आयोगाच्या संकेतस्थळावर दिव्यांग उमेदवारांकरीता मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत.
त्यानुसार आयोगामार्फत प्रसिध्द करण्यात येणाऱ्या जाहिरातीस अनुसरुन अर्ज सादर केल्यानंतर संबंधित दिव्यांग उमेदवारांनी सहायकाची मदत घेण्याची आणि/अथवा भरपाई वेळेची आवश्यकता असल्यास आयोगाकडे संबंधित सर्व कागदपत्रांसह विनंती अर्ज (प्रपत्र-१ अथवा प्रपत्र-२) सादर करुन पूर्व परवानगी घेणे अनिवार्य आहे.
आयोगामार्फत प्रसिध्द करण्यात आलेल्या खालील जाहिरातींस अनुसरुन अर्ज सादर केलेल्या व सहायकाची मदत घेण्याची आणि/अथवा भरपाई वेळेची आवश्यकता असलेल्या दिव्यांग उमेदवारांनी विहित नमुन्यातील विनंती अर्ज संबंधित सर्व कागदपत्रांसह [email protected] या ईमेल आयडीवर पाठविणे आवश्यक आहे




























































