नागपुरात दारुगोळा बनवणाऱ्या कंपनीत स्फोट, 2 जणांचा मृत्यू

नागपूरच्या डोरली गावाजवळ दारुगोळा बनवणाऱ्या कंपनीत स्फोट झाल्याची बातमी समोर येत आहे. या स्फोटात दोन जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. स्फोटावेळी अनेक कामगार हे या कंपनीत होते, अशी माहिती मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, स्फोट झाल्याची घटना घडली त्या कंपनीचे एशियन फ्रायर वर्क आहे. या कंपनीत फटाक्याची वात बनवण्याचं काम सुरू होतं. त्याचवेळी हा स्फोट झाला, असं सांगण्यात येत आहे. या स्फोटात दोघांचा मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले. घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. तसेच अग्निशमन दलाचे अधिकारी देखील घटनास्थळी पोहोचले आहेत. हा स्फोट नेमका कशामुळे झाला, याचा पोलीस तपास करत आहेत.