भाविकांसाठी आनंदाची बातमी, आजपासून वैष्णोदेवीसाठी एक्स्प्रेस ट्रेन

वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी आस लावून बसणाऱ्या भाविकांसाठी रेल्वेने आनंदाची बातमी दिली आहे. रेल्वेने अनेक महत्त्वपूर्ण निर्णयाची घोषणा केली असून 1 नोव्हेंबरपासून वैष्णोदेवीसाठी एक्स्प्रेस ट्रेन सुरू करण्यात येणार आहे. रेल्वेने प्रवाशांच्या सुविधा लक्षात ठेवून ज्या ट्रेनची सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे, त्यामध्ये उत्तर भारतातील तीर्थस्थळांचा आणि प्रमुख शहरांचा समावेश आहे.

यामध्ये खास करून वैष्णो देवी, ऋषिकेश आणि कामाख्याला जाणाऱ्या भाविकांसाठी खास सुविधा करण्यात आली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे रेल्वे सेवेला फटका बसला होता. यामुळे जम्मूहून येणाऱ्या ट्रेन बंद करण्यात आल्या होत्या, परंतु आता या ट्रेन पुन्हा एकदा धावणार आहेत.

कोणती ट्रेन कधी धावणार?

श्री माता वैष्णो देवी कठडा – योगनगरी ऋषिकेश – 1 नोव्हेंबरपासून.
श्री माता वैष्णो देवी कठडा – कोटा – 2 नोव्हेंबरपासून.
जम्मूतवी ते वांद्रे टर्मिनस – 3 नोव्हेंबरपासून.
श्री माता वैष्णो देवी कठडा – कामाख्या – 5 नोव्हेंबरपासून.

जम्मू रेल्वे मंडळचे वरिष्ठ कमर्शियल रेल्वे मॅनेजर उचित सिंघल यांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे ट्रकची सुरक्षा आणि निरंतरता सुनिश्चित केल्यानंतर रेल्वे पुन्हा एकदा चालवण्याचा निर्णय घेतला आहे.