
यूआयडीएआयने आयओएस आणि अँड्रॉइड युजर्ससाठी नवीन आधार अॅप लाँच केले आहे. या नव्या आधार अॅपमध्ये फेस अनलॉक आणि क्यूआर शेअरिंग यांसारखे अत्याधुनिक फीचर्स दिले आहेत. नव्या अॅपसोबत युजर्स आपल्या स्मार्टपह्नमध्ये आपली आधार आयडी डिजिटल पद्धतीने स्टोअर करू शकतील. यामुळे आता आधारकार्ड खिशात ठेवण्याची गरज भासणार नाही.
या नव्या अॅपमध्ये स्पॅन ऑथेंटिकेशन, बायोमेट्रिक लॉक फीचर्स आणि क्यूआर कोड दिले आहे. याशिवाय या अॅपमध्ये कमीत कमी पाच आधार प्रोफाइल बनवणे आणि त्यांना एकाच डिव्हाइसवर मॅनेज करण्याची परवानगी मिळणार आहे. हे सर्व आधार नोंदणीकृत मोबाईल नंबरने लिंक असायला हवेत. ज्या ठिकाणी नेटवर्कची अडचण आहे, त्या ठिकाणी काही फीचर्स ऑफलाईन वापरता येतील.




























































