फेसबुक झालंय डाऊन? ‘मेटा’कुटीला आलेल्या नेटकऱ्यांचा एक्स पोस्टवर प्रश्न

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोशल मीडियातील सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या फेसबुक ही वेबसाईट मंगळवारी सायंकाळी काम करेनाशी झाली. अनेकांचे सुरू असलेले अकाउंट लॉगआऊट झाले आणि पासवर्ड टाकूनही ते उघडले नाहीत. त्यामुळे नेटकरी चांगलेच वैतागलेले पाहायला मिळाले.

फेसबुक डाऊन असा ट्रेंडही एक्स पोस्टवर चालत असून सगळे एकमेकांना फेसबुक डाऊन झालं आहे का, असेल तर का झालं, असा प्रश्न विचारत आहेत. अद्याप मेटाने मात्र याबाबत कोणतीही माहिती संबंधित सोशल मीडियावर टाकलेली नाही. त्यामुळे नेटकरी आणखी बुचकळ्यात पडले आहेत.