फेसबुकने हिंदुस्थानात टेस्टिंगसाठी नवीन इंस्टाग्राम लाइट अ‍ॅप केले सादर, साईज फक्त 2MB

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
instagram-lite

इंस्टाग्रामने बुधवारी हिंदुस्थानात Instagram Lite व्हर्जनच्या टेस्टिंगची घोषणा केली आहे. फेसबुक फ्युल फॉर इंडिया कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी इंस्टाग्रामचे प्रॉडक्ट ऑफ हेड विशाल शहा यांनी ही घोषणा केली आहे.

Instagram Lite ची साईज 2MB पेक्षा कमी असून हा अ‍ॅप लो-एंड स्पेसिफिकेशन फोनसाठी आहे. हा अ‍ॅप सध्या गूगल प्ले स्टोरवर उपलब्ध आहे. याचा iOS व्हर्जन अद्याप लॉन्च करण्यात आला नाही.

Instagram Lite हे अ‍ॅप सर्वात आधी 2018 मध्ये मेक्सीकोमध्ये लॉन्च करण्यात आले होते. यानंतर पेरू, फिलिपाइन्स आणि इतर देशात हे अ‍ॅप लॉन्च करण्यात आले. कंपनीने 2018 मधेच हे अ‍ॅप हिंदुस्थानातही लॉन्च केले. मात्र या वर्षी Instagram Lite ला गुगल प्ले स्टोरवरून काढण्यात आले होते आणि पुन्हा सप्टेंबरमध्ये लॉन्च करण्यात आले.

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, इंस्टाग्राम लाइटच्या नवीन व्हर्जनमध्ये स्पीड आणि परफॉर्मन्स इम्प्रूव्ह करण्यात आले आहे. हे अ‍ॅप मुख्य अ‍ॅप प्रमाणेच असणार आहे. मात्र यात रिल्स, शॉपिंग आणि IGTV सारखे फीचर्स नसणार.