
आपल्या पोस्टपेक्षा दुसऱयाच्या पोस्टला एवढे लाइक्स कसे, या प्रश्नाने तरुण आता व्याकूळ होणार नाहीत. कारण फेसबुकने आपल्या प्लॅटफॉर्मवर लाइक्स लपवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे फेसबुकवर लाइक्स वॉर संपणार हे नक्की.
फेसबुक कंपनीने आपल्या अधिकृत युजर्सच्या पोस्टस्वर लाइक्स दाखवणे बंद करायला सुरुवात केली आहे. आज 27 सप्टेंबरला शुक्रवारी सर्वप्रथम ऑस्ट्रेलियात लाइक्स दिसणे थांबले आहे. त्यापाठोपाठ इतर देशांमध्येही लाइक्सबाबतचा नंबर गेम संपुष्टात येणार आहे. त्यामुळे एखादी पोस्ट लाइक करणाऱयाला लाइक्स आणि रिऍक्शन्सचा आयकॉन दिसेल, पण बाकी लोकांकडून ते लपवले जाणार आहे.
व्हिडीओ व्हय़ूजही लपवणार!
आपण पोस्ट केलेल्या व्हिडीओला किती व्हय़ूज मिळाले म्हणजे किती जणांनी तो पाहिला हे आपल्याला कळले तरी इतरांच्या व्हिडीओ पोस्ट्सना किती व्हय़ूज मिळाले ते लपवण्याची तयारीही फेसबुक कंपनीने सुरू केली आहे. आपल्या पोस्टवर आलेले लाइक्स आणि कमेंट्स आपण पाहू शकणार आहोत.
























































