Operation Sindoor Debate : 3 महिन्यानंतरही पाच दहशतवादी सापडले नाही हे सरकारचं अपयश – खासदार अमर काळे

“3 महिन्यानंतरही पाच दहशतवादी सापडले नाही हे सरकारचं अपयश”, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमर काळे यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. पावसाळी अधिवेशनात आज लोकसभेत ऑपरेशन सिंदूरवर चर्चा सुरू आहे. यावेळी संसदेत बोलत असताना ते असं म्हणाले आहेत.

यावेळी बोलताना मुंबईतील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख करत अमर काळे म्हणाले की, “ताज हल्ल्यादरम्यान अजमल कसाबला जिवंत पकडण्यात आले होते. त्याच्या माध्यमातून हल्ल्याचा पाकिस्तानी संबंध सिद्ध झाला होता. पहलगाम हल्ल्याला 3 महिने उलटून गेले आहेत. पण अद्याप 5 दहशतवादी पकडले गेले नाहीत.”

अमर काळे म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 9 वेळा अमेरिकेला भेट दिली आहे. तरीही ऑपरेशन सिंदूरनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पाकिस्तानच्या लष्कर प्रमुख्यांना जेवनासाठी बोलवतात. ही हिंदुस्थनी म्हणून आपल्यासाठी वाईट गोष्ट आहेत, मंत्र्यांनी आपली परराष्ट्र निती कुठे कमी पडली? याची माहिती सभागृहाला द्यावी”, असंही ते यावेळी म्हणाले.