
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
‘ट्विटर’ने अकाऊंटस्ची झाडाझडती सुरू करताच पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्यासहित अनेकांना आपले हजारो ट्विटर फॉलोअर्स गमवावे लागले आहेत. ट्विटरने झाडाझडतीमध्ये असंख्य संशयास्पद आणि निक्रिय खाती ‘डिलीट’ करून टाकली आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २ लाख ८४ हजार ७४६ ट्विटर फॉलोअर्स गमावले आहेत. आता त्यांच्या फॉलोअर्सची संख्या ४ कोटी ३१ लाख इतकी आहे.
काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना १७ हजार ५०३ ट्विटर फॉलोअर्स गमवावे लागलेत. आता त्यांच्या फॉलोअर्सची संख्या ७३ लाख ३० हजार इतकी आहे.
यांनीही गमावले फॉलोअर्स –
- सुषमा स्वराज, परराष्ट्रमंत्री – ७४ हजार १३२
- स्मृती इराणी, वस्त्रोद्योगमंत्री – ४१ हजार २८०
- शशी थरूर, काँग्रेस नेते – १ लाख ५१ हजार ५०९
- डेरेके ओ ब्रायन, नेते तृणमूल काँग्रेस – १० हजार ९०२
लोकांचा विश्वास जपण्यासाठी आणि संस्कृत संवादासाठी ‘ट्विटरने’ अकाऊंटस्ची जागतिक पातळीवर झाडाझडती हाती घेतली आहे. त्यात अवैध ठरलेली अकाऊंटस् काढून टाकली जात आहेत. त्यामुळे फॉलोअर्सची संख्या घटणार आहे.


























































