
लॉकडाउन कालावधीत प्रवासासाठी इ-पास काढताना बनावट मेडिकल सर्टिफिकेट सादर करणाऱ्या तिघांविरुद्ध वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अजिंक्य जगदीश पाटील (रा. सेनापती बापट रस्ता), पवन शदर शिंपी (वय 18) आणि कुणाल संतोष सावंत (दोघेही रा. रा. वारजे माळवाडी ) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस नाईक अमोल पायगुडे यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवासासाठी पुणे पोलिसांचा इ-पास काढण्यासाठी अजिंक्य, पवन आणि कुणालने बनावट मेडीकल सर्टिफिकेट सादर केले होते. कागदपत्रांच्या तपासणीवेळी संबंधित मेडीकल प्रमाणपत्र बनावट असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यानुसार पोलिसांनी तिघांविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी वारजे माळवाडी पोलिस तपास करीत आहेत.



























































