
दिवाळीआधीच सोने आणि चांदीच्या दरवाढीला अखेर ब्रेक लागला. गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदीच्या किमतीत सातत्याने वाढ होत होती, परंतु शुक्रवारी सोने-चांदीच्या दरात घसरण झाली. सोन्याची किंमत 2 हजार 600 रुपयांनी, तर चांदीची किंमत 4 हजार रुपयांनी स्वस्त झाली. त्यामुळे सोने आणि चांदीची खरेदी करू पाहणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
बुधवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याच्या एका तोळ्यासाठीचा दर 1 लाख 20 हजार रुपये आहे. दोन दिवसांपूर्वी हाच दर 1 लाख 23 हजार 677 रुपयांपर्यंत पोहोचला होता. चांदीच्या दरातही घसरण झाली आहे. 8 ऑक्टोबरला चांदीचे दर 1 लाख 53 हजार 388 रुपयांवर पोहोचले होते. आज चांदीचे दर 1 लाख 49 हजार 115 रुपयांवर पोहोचले आहेत. याचाच अर्थ चांदीच्या दरात 4 हजार रुपयांची घसरण झाली आहे. सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याचा दर प्रतितोळा 1,22,845 रुपये, 22 कॅरेट सोन्याचा दर 1,20,361 रुपये, तर 18 कॅरेट सोन्याचा दर 90,634 रुपये प्रतितोळा आहे.