ज्येष्ठ साहित्यिक प्रा. भास्कर चंदनशिव यांचे निधन

marathi-writer-bhaskar-chandanshiv-dies

‘लाल चिखल’ या कथेमुळे महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेले ज्येष्ठ साहित्यिक प्रा. भास्कर चंदनशिव यांचे शनिवारी निधन झाले. लातूर येथील एका खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

प्रा. भास्कर चंदनशिव हे धाराशीवच्या कळंब तालुक्यातील हासेगावचे होते. मराठी विषयात एमए झालेल्या चंदनशिव यांचा शिकवण्याचा विषय मराठीच होता. त्यांच्या साहित्यातून त्यांनी ग्रामीण भागातील जीवनाचा विविधांगी वेध घेतला. जांभळढव्ह, अंगार माती, नवी वारूळ, बिरडं, मरणकाळा हे त्यांचे कथासंग्रह गाजले. ‘भूमी आणि भूमिका’ हा समीक्षा ग्रंथ, तर रानसय हा ललित संग्रहही गाजला. त्यांची 14 पुस्तके प्रकाशित झाली होती. राज्य शासनाचे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले.