
सामना ऑनलाईन । वॉशिंग्टन
सध्या सोशल मीडियावर एका प्रसिद्ध गायकाचा त्याच्या प्रेयसीसोबत चुंबन करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत या गायकाचे चाहते त्याला प्रेयसीसोबत चुंबन करताना अडवत असल्याचे या व्हिडीओत दिसत आहे. हा गायक म्हणजे जगप्रसिद्ध गायक जस्टिन बिबर आहे.

जस्टिनने काही दिवसांपूर्वीच त्याची प्रेयसी हॅले बाल्डविनसोबत साखरपुडा केल्याची घोषणा केली होती. जस्टिनच्या या घोषणेनंतर त्याचे चाहते प्रचंड खूश झाले होते. गेल्या काही दिवसांपासून जस्टीन आणि हॅले एकमेकांसोबत फिरताना दिसतायत. हे दोघेही एकमेकांच्या आकंठ प्रेमात बुडालेले आहेत.
here’s a video, he literally pointing and talking about meee ahhh pic.twitter.com/GcItwiTazK
— (@bzyph18) July 19, 2018
शुक्रवारी जस्टिन व हॅले वॉशिंग्टनच्या रस्त्यावर फिरत असताना चुंबन करत होते. त्यावेळी तेथून जात असलेल्या एका कारमधील त्याच्या चाहत्यांनी त्यांचा व्हिडीओ काढला. ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी जस्टिन व हॅलेला चुंबन करताना थांबवून एक फोटो काढू देण्याची विनंती केली. त्यांच्या या विनंतीला जस्टिनने देखील आनंदाने होकार दिला.
























































