
सामना प्रतिनिधी, बीड
दुष्काळाचे संकट, नापिकी, भविष्यात काय होईल, सगळे कुटुंब उघडे पडले, कसे जगावे या नैराश्यातून 60 वर्षीय शेतकऱ्याने कोरड्या विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना बीड तालुक्यातील लोळदगाव येथे घडली
लोळदगाव येथील वृद्ध शेतकरी गंगाधर महादेवराव साळुंके (60) या शेतकऱ्याने नापिकी आणि आर्थिक संकटामुळे आत्महत्या केली. त्यांच्याकडे चार एकर शेती आहे. सर्व कुटुंबाचा उदरनिर्वाह या चार एकर शेतीवरच होता, त्यात दुष्काळाचे संकट आणि यंदाची नापिकी आता संपूर्ण वर्ष कसं भागवायचं या विवंचनेतून त्यांनी विहीरीत उडी मारून जीव दिला.



























































