श्रीगोंद्यात शेततलावात बुडून शेतकऱ्याचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । श्रीगोंदा

श्रीगोंदा शहर आणि पारगाव सुद्रिक या गावच्या सरहद्दीवर असलेल्या बोरुडेवाडी येथील शेततलावात आपली पाण्याची मोटार गळत असल्याचे पाहण्यासाठी यशवंत उर्फ बापू राजू बोरुडे गेले होते. त्यांनी धरलेले दावे तुटल्याने ते पाण्यात पडले. त्यांचा शेततलावाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. बोरुडेवाडी येथील यंशवंत उर्फ बापु राजु बोरुडे यांचे डाळिंब, द्राक्षाची शेती बोरुडे वाडीत आहे. या शेतीला पाण्याची सोय होण्यासाठी त्यांनी शेतात शेततलाव केला आहे. या तलावात पाणी किती आहे. तसेच तलावाचा कागद लिकेज झाला आहे हे पाहण्यासाठी बोरुडे गेले होते. यावेळी त्यांच्या हातातील दावे तुटल्याने पाय घसरून ते शेततलावात पडले. तलावात बुडाल्याने त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ग्रामस्थांच्या अथक प्ररिश्रमांनंतर पाण्यातून मृतदेह बाहेर काढण्यात आला. उत्तरीय तपासणीनंतर बोरुडेवाडी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.