नांदेडमध्ये शेतकऱ्याचा गळफास घेऊन आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
farmer-suicide-01

सामना प्रतिनिधी । नांदेड

सततची नापिकी आणि बँकेच्या कर्जाचे ओझे यामुळे नांदेड जिल्हय़ातील कंजारत तालुक्यातील फुटवळ गावचे शेतकरी अर्जुन मंगनाळे (60) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. गेल्या महिनाभरात मराठवाडय़ातील तब्बल 114 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे.

2015मध्ये महाराष्ट्रात 3000 शेतकऱ्यांच्या आत्महत्या
‘एनसीआरबी’च्या आकडेवारीनुसार 2015मध्ये देशभरात आठ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यात महाराष्ट्रात सर्वात जास्त तब्बल 3000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्याखालोखाल तेलंगणात 1358 आणि कर्नाटकात 1197 शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. 2015मध्ये देशात 4500 शेतमजुरांनी आत्महत्या केल्या होत्या.

शेतकऱ्यांच्या बहुतांशी आत्महत्या कर्जबाजारीपणामुळे झाल्या आहेत. 2014मध्ये देशात 5650 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या, असे ‘एनसीआरबी’ने म्हटले आहे.