अतिवृष्टी व अवकाळी पावसाचा फटका, नोव्हेंबर महिन्यात 300 शेतकऱ्यांनी जीवन संपवले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यांत झालेली अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे राज्यातील खरीपाच्या पिकांचे 70 टक्के नुकसान झाले. या  नुकसानीचा फटका राज्यातील जवळपास एक कोटी लोकांना बसला आहे. परिणामी नोव्हेंबर महिन्यात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. या एका महिन्यात 300 शेतकऱ्यांनी आत्महत्या करून आपले जीवन संपवल्याची माहिती सरकारी आकडेवारीतून पुढे आली आहे. यापूर्वी 2015 मध्ये इतक्या मोठय़ा प्रमाणात आत्महत्या झाल्या होत्या.

दुष्काळ, नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे अडचणीत आल्याने राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरू आहे. त्यातच ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे राज्यातील खरीपाच्या पिकांचे 70 टक्के नुकसान झाले. या नुकसानीचा फटका राज्यातील जळपास एक कोटी लोकांना बसला आहे. यामध्ये मराठवाडय़ाततील 44 लाख शेतकऱ्यांचा समावेश आहे. या कालावधीत राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झाल्याने 2019 मधील आत्महत्येचा आकडा 2018 च्या तुलनेत वाढला आहे.

मराठवाड

य़ात 120 शेतकऱ्यांनी जीवन संपवले

गेल्या चार वर्षांच्या तुलनेत राज्यात 2019 मध्ये ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात शेतकरी आत्महत्येच्या आकडेवारीत 61 टक्यांनी वाढ झाली आहे. ऑक्टोबरमध्ये 186 तर नोव्हेंबर महिन्यात 114 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. सर्वात जास्त आत्महत्या दुष्काळग्रस्त मराठवाडय़ात झाल्या आहेत. नोव्हेंबर महिन्यात मराठवाडय़ात 120 तर विदर्भात 112 शेतकऱ्यांनी जीवन संपवले.

मागील वर्षभरात 2532 आत्महत्या

राज्यात मागील वर्षभरात म्हणजे 2019मध्ये एकूण 2532 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. 2018 मध्ये हा आकडा 2518 इतका होता. 2017 मध्ये 2674 तर 2016 मध्ये 2858 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या.