faशन paशन

योगेश देशपांडे

तुझी आवडती फॅशन…कॅज्युअल्स

फॅशन म्हणजे…खऱया अर्थाने काळाला साजेशी आणि काळानुरुप जाणारी. आपल्या व्यक्तिमत्वाला शोभून दिसेल, आवडेल आणि साजेशी वाटेल खरंतर ती माझ्यासाठी फॅशन.

व्यक्तिगत आयुष्यात कशा प्रकारचे कपडे घालण्यास प्राधान्य देता?…कॅज्युअल आणि कॉटन वेअर कपडे आवडतात. ज्यातून आपल्या वावरण्यातील सहजता दिसू शकेल, ज्यातून ऑकवर्ड होणार नाही, लोकांशी संवाद अगदी सहजतेने साधता येतो, तीच माझ्यासाठी फॅशन.

फॅशन म्हणजे केवळ कपडे की?…नाही. फॅशन म्हणजे तुमचं वागणं बोलणं, तुमचा तंत्रज्ञानाशी असलेला संबंध, तुमची व्यक्त करण्याची शैली, तुमची संभाषणाची पद्धत.

आवडती हेअरस्टाईल?…फार जास्त कंगव्याचा वापर न करता केलेली.

फॅशन जुनी की नवी?…खरं तर जुनं नवं असं काही नाही. ज्यामध्ये आपण प्रोग्रेसिव्ह काहीतरी बोलू शकू, सांगू शकू किंवा दिसू शकू अशा अर्थाचे काहीही. जे आऊटडेटेड आहे असे कोणी म्हणता कामा नये, पण जुन्या काळाचा थोडा प्रभाव जाणवेल असे .

आवडता रंग?…रंग हा माझा आवडता विषय आहे. कारण शिक्षणाने मी कमर्शिअल आर्टिस्ट आहे. त्यामुळे रंग मला सगळे आवडतात. त्यात हिरवा, निळा, काळा, सफेद रंग आवडतो.

स्ट्रीट शॉपिंग आवडते का?…काही वैशिष्टय़पूर्ण आणि मॉल संस्कृतीत सापडणार नाही असं दिसलं की शंभर टक्के घ्यायला आवडेल. अलिकडे स्ट्रीट शॉपिंग फारशी होत नाही, पण पुण्यात कॅम्प परिसरात मी शॉपिंग करायचो. कारण नवं काही आलं तर तिथे पटकन येतं असं पुण्यातल्या मांझ्या कॉलेजच्या दिवसापासून मी अनुभवलेले आहे. त्यामुळे नवं काही सापडलं तर नक्की शॉपिंग करेन शिवाय तिथे माणसं अनुभवायला मिळतात. एक कलाकार म्हणून मला या सगळ्या गोष्टी निरिक्षण करायला आवडतात.

कोणत्या गोष्टीवर जास्त खर्च करता?… कपडे

ज्वेलरीमध्ये काय आवडते?… वेगवेगळी घडय़ाळे

आवडता ब्रॅण्ड…कॉटन वर्ल्ड

फॅशन फॉलो कशी करतोस?…बऱयापैकी ऑनलाईन, इतर चित्रपट वगैरे आहेत त्यातून. महानायक अमिताभ बच्चन यांचा मी मोठा फॉलोअर आहे. त्यामुळे त्यांना फॉलो करतो.

फॅशनबाबत अपडेट राहण्यासाठी?…सोशल साईट्सच्या माध्यमातून अपडेट राहतो.

ब्युटी सिक्रेट…नियमित योगा

बॅगेत हमखास आढळणाऱया तीन गोष्टी…परफ्युम, सनग्लासेस आणि स्टोल.

फिटनेससाठी..सतत काम करुन कार्यशील राहणे. त्यामुळे आपोआप आपण फिट असल्याचे सांगत राहतो.