मुलगी समलैंगिक असल्याने बापाने केली आत्महत्या

मुलगी समलैंगिक असल्याने दिल्लीत एका पित्याने गोळी घालून आत्महत्या केली आहे.  आपली मुलगी समलैंगिक असल्याने घरात तणाव वाढला होता. मुलीने जेव्हा वडिलांचे ऐकण्यास नकार दिला तेव्हा वडिलांनी टोकाचे पाऊल उचलले.

आपली मुलगी समलैंगिक आहे ही बाब एका पित्याला पटली नाही. म्हणून घरात सारखे वाद विवाद होत होते. मुलगी सारखी आपल्या पार्टनरसोबत राहण्याचा हट्ट धर होती. त्यामुळे घरात तणावाचे वातावरण होते. मंगळवारी पुन्हा या विषयावरून मुलगी आणि वडिलांमध्ये पुन्हा वाद झाला. भांडण झाल्यावर वडील घरी परतले आणि स्वतःवर गोळी झाडून घेतली. कुटुबीयांनी तत्काळ त्यांना जवळच्या इस्पितळात दाखल केले परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेचा पंचनामा करून पुढील तपास सुरू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या