
अमेरिकेत नव्या वर्षात बॉम्बस्फोट घडविण्याचा आखलेला कट अमेरिकेच्या एफबीआयने उधळून लावला. कॅलिफोर्नियाच्या लॉस एंजलिस आणि ऑरेंज काऊंटी क्षेत्रात बॉम्बस्फोट घडवून आणणार होते. या ऑपरेशनला ‘मिडनाइट सन’ असे कोड नाव दिले होते. या प्रकरणी चार संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. 12 डिसेंबरला या दहशतवाद्यांनी सुदूर मोजावेचा दौरा केला होता. या परिसरात दहशतवाद्यांनी आयईडीचा स्फोट करून चाचणीही केली होती. कट रचण्यामागे टर्टल आयलँड लिबरेशन फ्रंट असल्याचे सांगितले जात आहे.






























































