
भारतीय विमानतळ प्राधिकरणाद्वारे चालविल्या जाणाऱ्या देशातील सहा छोटय़ा विमानतळांच्या लिलावाची प्रक्रिया खासगी-सार्वजनिक हिस्सेदारीद्वारे गेल्या वर्षी सरकारने सुरू केली होती. फेब्रुवारी महिन्यामध्ये यासंदर्भातील निर्णय भारतीय विमानतळ प्राधिकरणाने घेतला. या निविदेत अदानी समूहाने बाजी मारली. समूहाने अहमदाबाद, जयपूर, लखनऊ, तिरुअनंतपुरम, गुवाहाटी आणि मंगळुरू या पाच विमानतळांच्या परिचलनाचे कंत्राट मिळविले. मात्र केरळ सरकारने याविरुद्ध कोर्टात याचिका दाखल करत तिरुअनंतपुरम विमानतळ कोणत्याही खासगी कंपनीला चालवण्यास देणार नाही अशी भूमिका घेतली होती. पुढील 50 वर्षांकरिता या विमानतळांच्या देखभाल तसेच परिचलनाचे कंत्राट अदानी समूहाकडे असेल.

























































