महिला आयपीएस अधिकाऱ्याची चौकशी

एका महिला आयपीएस अधिकाऩयाची आज आर्थिक गुन्हे शाखेत तासभर चौकशी करण्यात आली. त्यांच्या पती विरोधात दाखल फसवणुकीच्या दोन गुह्यांप्रकरणी त्यांना समन्स बजावण्यात आले होते. त्यानुसार त्या अधिकारी आज चौकशी पथकासमोर हजर राहिल्या. मुंबई, ठाणे आणि पुणे येथे सरकारी कोटय़ातील घरे सवलतीच्या दरात मिळवून देण्याच्या नावाखाली 20 जणांची सुमारे 24 कोटी 78 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. ही फसवणुक केल्या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने त्या महिला आयपीएस अधिकाऱयाच्या पतीसह 11 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.