लॉकडाऊन टप्प्या टप्प्याने कमी करा, फिक्कीचा केंद्र सरकाराला सल्ला

1135

देशात कोरोनाचे संकट वाढत आहे. केंद्र सरकार लॉकडाऊन वाढवणार का? अशी चिंता संपूर्ण देशवासियांना लागली आहे. पुढील चार दिवसांत लॉकडाऊन संपेल. या पार्श्वभुमीवर फिक्की या संस्थेने लॉकडाऊन कसा कमी करावा यावर काही सूचना दिल्या आहेत. लॉकडाऊन टप्याटप्प्याने कमी करावा असा सल्ला फिक्कीने दिला आहे. तसेच आयटी विभाग आण शाळा सध्या बंदच ठेवाव्यात असेही फिक्कीन म्हटले आहे.

मजुरांना 15 एप्रिल पासून कामाला बोलावायला पाहिजे, मजुरांचे प्रमाण कमी कसे राहील यावर लक्ष दिले पाहिजे. कोरोना फ्री जिल्ह्यात लॉकडाऊन हटवण्याची सुरूवात केली पाहिजे असेही फिक्कीन म्हटले आहे. थोड्या फार प्रमाणात रीटेल स्टोअर सुरू केले पाहिजे असे फिक्कीने म्हटले पाहिजे. तसेच ई कॉमर्स आणि देशांतर्गत उड्डाणेही थोड्या फार प्रमाणात सुरू झाले पाहिजे असेही फिक्कीने म्हटले आहे.

रस्ते, रेल्वे मार्ग टप्याटप्याने सुरू केले पाहिजे, देशातील सर्व हॉटेल्स बंद राहिले पाहिजे असे फिक्किने म्हटले आहे. संपूर्ण देशात सामान ने आण करण्यासाठी परवानगी मिळाली पाहिजे. अत्यावेशक सामानांची ने आण करण्यासाठी सैन्याची मदत घेतली पाहिजे. कोरोना फ्री जिल्ह्यात उत्पादन आणि वितरण सेवा सुरू झाली पाहिजे. सुरूवातीला 22-39 वयोगटातील लोकांना काम करण्याची मुभा दिली पाहिजे. वृद्ध कर्मचार्‍यांना काम करण्याची परवानगी देता कामा नये असे फिक्कीने म्हटले आहे.

कर्मचार्‍यांसाठी आरोग्य सुविधा वाढल्या पाहिजे. तसेच मास्कचे उत्पादन मोठा प्रमाणात वाढवले पाहिजे. तर संशयित कोरोना रुग्णांच्या घरात येणार्‍या प्रत्येकाची टेस्ट झाली पाहिजे अशा सूचना फिक्कीने दिल्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या