
सामना ऑनलाईन । मॉस्को
रशियामध्ये महिनाभर सुरू असलेल्या फुटबॉल वर्ल्ड कपची फायनल किक रविवारी बसणार आहे. एकीकडे ब्राझील, स्पेन, जर्मनी या ‘दादा’ संघांचे शूटआऊट झाले असतानाच १९९८ साली चॅम्पियन ठरलेल्या फ्रान्सने प्रतिमेला साजेशी कामगिरी करीत अंतिम फेरीत धडक मारली. त्यांच्यासमोर जायंट किलर क्रोएशियाचे आव्हान आहे. कोणाच्या खिजगणतीत नसलेल्या आणि अवघ्या ४० लाख लोकसंख्या असलेल्या या देशाने फायनलचे तिकीट बुक करताना भल्याभल्या संघांचा घामटा काढलाय. आता जेतेपदाच्या लढतीत फ्रान्स दुसऱ्यांदा वर्ल्ड चॅम्पियन होतोय की जगाला क्रोएशियाच्या रूपात नवा वर्ल्ड चॅम्पियन मिळतोय हे पाहणे रंजक ठरणार आहे.
फ्रान्स तिसऱ्यांदा वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये. १९९८मध्ये मायदेशात जगज्जेतेपदाचा मान संपादन केला होता. २००६मध्ये फायनल लढतीत इटलीकडून पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभव. क्रोएशिया प्रथमच वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये. १९९८मध्ये पदार्पणातच सेमीफायनलमध्ये धडक. मात्र, फ्रान्सकडून १-२ गोलफरकाने पराभव. फ्रान्स-क्रोएशिया ५ वेळा आमने-सामने. फ्रान्सचे ३ विजय, क्रोएशियाचे २ विजय, तर एक लढत ड्रॉ.



























































