VIDEO : भाजप आमदार बाळासाहेब सानप यांच्या मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा

92

सामना ऑनलाईन । नाशिक

गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये डीजे वाजवण्यास मुंबई हायकोर्टाने बंदी घातली आहे. मात्र, नाशिकमध्ये आमदार बाळासाहेब सानप यांच्या समर्थकांनी कोर्टाच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे. सानप यांच्या तपोवन मित्र मंडळाच्या गणपती मिरवणुकीत डीजेचा दणदणाट सुरु आहे. दरम्यान, डीजेच्या तालावर मंडळाचे कार्यकर्ते बेभान नाचत असतांना अचानक तुफान हाणामारी झाली. या हाणामारीचे नक्की कारण स्पष्ट झाले नाही, मात्र हाणामारामुळे काहीकाळ मिरवणुकीत गोंधळ निर्माण झाला.

आपली प्रतिक्रिया द्या