धुळ्यात निवडणुकीच्या वादातून दोन गटांत धुमश्चक्री

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, धुळे

नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिका निवडणुकीच्या वादातून शुक्रवारी रात्री नारायण मास्तर चाळीत जाधव समर्थक निकम आणि पुकळे या दोन गटांत शुक्रवारी रात्री धुमश्चक्री उडाली. त्या वेळी शिवसेनेचे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुधीर जाधव भांडण सोडविण्यासाठी गेले असता ते गोळीबारात जखमी झाले.

या वेळी पोलीस घटनास्थळी दाखल झाल्याने परिस्थिती नियंत्रणाखाली आली. त्यांनी दोन्ही गटांतील 24 जणांवर गुन्हे दाखल करून तीन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. धुळे शहरातील लेनीन चौक ते क्रांती चौकदरम्यान नारायण मास्तरची चाळ ही कष्टकऱयांची वसाहत आहे. या भागातील जाधव आणि पुकळे परिवार अनेक वर्षे राजकारणात सक्रिय असून ते परस्परांच्या विरोधात असतात. नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत या दोन्ही गटांनी एकत्र येऊन निवडणूक लढवावी असा प्रयत्न काहींकडून झाला, मात्र त्यात अपयश आल्याने या दोन्ही परिवारातील राजकीय वैर अजूनच वाढले.

निवडणुकीत जाधव परिवाराला यश मिळाले. त्याचवेळी पुकळे परिवाराला पराभव वर्मी बसला होता. असे असताना शुक्रवारी रात्री 11 च्या सुमारास जाधव परिवाराचे समर्थक असलेले गणेश निकम आणि पुकळे परिवारातील काही तरुणांमध्ये चर्चा होत होती. तेव्हा गणेश निकम यांनी पुकळे परिवाराच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचा उल्लेख केला आणि वादाची ठिणगी पडली. निकम आणि पुकळे यांच्यात शाब्दिक वाद झाला. थोडय़ाच वेळात पुकळे गटातील काही तरुणांनी थेट निकम यांच्या घरावरच हल्ला चढवला. यावेळी हल्ला करणाऱयांच्या हातात हॉकी स्टीक, लाकडी दांडे, सळई होती. त्यांनी गणेश निकम यांच्यासह त्यांच्या नातलगांना तसेच शेजारी राहणाऱयांना मारहाण सुरू केली. त्यावेळी शिवसेनेचे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुधीर जाधव भांडण सोडविण्यास गेले, पण संतप्त झालेल्या अमोल पुकळे याने गावठी पिस्तुलातून जाधव यांच्या दिशेने गोळी झाडली. गोळी सुधीर जाधव यांच्या पोटाला चाटून गेली. त्यांना तातडीने भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या दवाखान्यात दाखल करण्यात आले. तसेच माजी नगराध्यक्ष, विद्यमान नगरसेवक आणि जाधव यांचे बंधू संजय जाधव यांच्यासह गणेश निकम व त्यांचे अन्य साथीदार या हल्ल्यात जखमी झाले आहेत.

पोलिसांनी घटनास्थळी शोधमोहीम राबवून एक गावठी पिस्तुलासह जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. शिवाय या घटनेतील संशयित आरोपी दिनेश रमेश पुकळे, तुषार रमेश पुकळे, शुभम सपकाळे अशा तिघांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, पोलीस उपअधीक्षक सचिन हिरे, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक गणेश चौधरी, व्ही.एन.ठाकरे, उपनिरीक्षक एम.डी.खडसे यांनी पोलीस बंदोबस्त घेऊन परिस्थितीवर नियंत्रण मिळवीत शांतता प्रस्थापित केली. तर या घटनेने सिद्धार्थ नगर, सहजीवन नगर, भीमनगर या भागांतही वातावरण तापले होते. पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून या भागांत पोलीस बंदोबस्त ठेवला आहे.

महानगरपालिका निवडणुकीत आपल्या आईचा पराभव झाला. त्यावेळी गणेश निकम, संजय जाधव, सुधीर जाधव यांनी दमबाजी केली होती. गुरुवारी रात्रीही भाऊ अमोल हा चौकात उभा असताना गणेश निकम, संजय जाधव, सुधीर जाधव, सुनिल पाटील, बंटी जाधव आदी त्या ठिकाणी आले. त्यांनी वाद घालून मारहाण केली. यावेळी संजय निकम याने आपल्यावर बंदुकीतून गोळी झाडून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला, तर सुधीर जाधव याने चाकूने वार केले, असे दीपक पुकळे याने सांगितले.

राजकारणात सक्रिय असून ते परस्परांच्या विरोधात असतात. नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत या दोन्ही गटांनी एकत्र येऊन निवडणूक लढवावी असा प्रयत्न काहींकडून झाला, मात्र त्यात अपयश आल्याने या दोन्ही परिवारातील राजकीय वैर अजूनच वाढले. निवडणुकीत जाधव परिवाराला यश मिळाले. त्याचवेळी पुकळे परिवाराला पराभव वर्मी बसला होता. असे असताना शुक्रवारी रात्री 11 च्या सुमारास जाधव परिवाराचे समर्थक असलेले गणेश निकम आणि पुकळे परिवारातील काही तरुणांमध्ये चर्चा होत होती. तेव्हा गणेश निकम यांनी पुकळे परिवाराच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचा उल्लेख केला आणि वादाची ठिणगी पडली. निकम आणि पुकळे यांच्यात शाब्दिक वाद झाला. थोडय़ाच वेळात पुकळे गटातील काही तरुणांनी थेट निकम यांच्या घरावरच हल्ला चढवला.

यावेळी हल्ला करणाऱयांच्या हातात हॉकी स्टीक, लाकडी दांडे, सळई होती. त्यांनी गणेश निकम यांच्यासह त्यांच्या नातलगांना तसेच शेजारी राहणाऱयांना मारहाण सुरू केली. त्यावेळी शिवसेनेचे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुधीर जाधव भांडण सोडविण्यास गेले, पण संतप्त झालेल्या अमोल पुकळे याने गावठी पिस्तुलातून जाधव यांच्या दिशेने गोळी झाडली. गोळी सुधीर जाधव यांच्या पोटाला चाटून गेली. त्यांना तातडीने भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या दवाखान्यात दाखल करण्यात आले. तसेच माजी नगराध्यक्ष, विद्यमान नगरसेवक आणि जाधव यांचे बंधू संजय जाधव यांच्यासह गणेश निकम व त्यांचे अन्य साथीदार या हल्ल्यात जखमी झाले आहेत.

पोलिसांनी घटनास्थळी शोधमोहीम राबवून एक गावठी पिस्तुलासह जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. शिवाय या घटनेतील संशयित आरोपी दिनेश रमेश पुकळे, तुषार रमेश पुकळे, शुभम सपकाळे अशा तिघांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, पोलीस उपअधीक्षक सचिन हिरे, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक गणेश चौधरी, व्ही.एन.ठाकरे, उपनिरीक्षक एम.डी.खडसे यांनी पोलीस बंदोबस्त घेऊन परिस्थितीवर नियंत्रण मिळवीत शांतता प्रस्थापित केली.

महानगरपालिका निवडणुकीत आपल्या आईचा पराभव झाला. त्यावेळी गणेश निकम, संजय जाधव, सुधीर जाधव यांनी दमबाजी केली होती. गुरुवारी रात्रीही भाऊ अमोल हा चौकात उभा असताना गणेश निकम, संजय जाधव, सुधीर जाधव, सुनिल पाटील, बंटी जाधव आदी त्या ठिकाणी आले. त्यांनी वाद घालून मारहाण केली. यावेळी संजय निकम याने आपल्यावर बंदुकीतून गोळी झाडून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला, तर सुधीर जाधव याने चाकूने वार केले.
-दीपक पुकळे

रात्री गणेश निकम, सुनील पाटील यांना मारहाण होत असल्याचे भावाने कळविले. भांडण सोडविण्यासाठी मी तेथे गेलो होतो. त्यावेळी समोरील 25 ते 30 तरुण दारू प्यायलेले असल्याने ते ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. तरीही त्यांना समजावण्याची प्रयत्न केला, मात्र त्यांनी ऐकण्याऐवजी मारहाण केली. या मारहाणीत गणेश निकम, सुनील पाटील जखमी झाले तर समोरून आपल्यावर गोळी झाडण्यात आली. ती पोटाला चाटून पाठीत रुतली. त्वरित उपचार करीत डॉक्टरांनी शरीरातील गोळी काढली. आता प्रकृती ठीक आहे.
– सुधीर जाधव