कोपरगावात दोन गटात हाणामारी; 13 जणांवर गुन्हे दाखल, सातजण जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोपरगावातील इंदिरापथ, संजयनगर येथे रविवारी सायंकाळी गाय बांधल्याच्या कारणावरून झालेल्या हाणामारीत सातजण जखमी झाले आहेत. हाणामारी प्रकरणी आणि संचारबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी 13 जणांविरुद्ध कोपरगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.

याप्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रविवारी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास पूर्वीच्या भांडणावरुन आणि घराशेजारील जागेत गाय बांधण्याचे कारणावरुन दोन गटात वाद झाला. त्याचे रुपांतर हाणामारीत झाले. या हाणामारीत दोन्ही गटातील सात जण जखमी झाले असून परस्परविरुद्ध दिलेल्या तक्रारीवरून 13 जणांविरोधात कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात मारहाणीचा तसेच संचारबंदी आदेशाचे उल्लघंन केल्याचा गुन्हे दाखल करण्यात आला आहे. योगेश घनश्याम गायकवाड यांनी दिलेल्या तक्रारीवरून रुपेश कैलास जाधव ,संतोष रामभाऊ चव्हाणके, लक्ष्मण सिताराम चव्हाणके, अभि पुणेकर,दादा बाळासाहेब जाधव, रोहिण बाळासाहेब जाधव, सरुबाई बापुराव जाधव, शंकर यादव, अभि लक्ष्मण चव्हाणके या नऊ जणांविरोधात तर रुपेश कैलास जाधव यांनी दिलेल्या तक्रारीवरून योगेश घनश्याम गायकवाड, घनश्याम गोविंद गायकवाड,मंदाबाई घनश्याम गायकवाड व मयूरी योगेश गायकवाड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या हाणामारीत योगेश घनश्याम गायकवाड, घनश्याम गोविंद गायकवाड, मंदाबाई घनश्याम गायकवाड, बाळासाहेब बापुराव जाधव, रुपेश कैलास जाधव, सरुबाई बापुराव जाधव,रोहिणी बाळासाहेब जाधव जखमी झाले असून त्यांच्यावर कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पुढील तपास पोलीस करीत आहेत.