
‘धुरंधर’ने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. हा चित्रपट केवळ हिंदुस्थानात नव्हे तर जगभरात पाहिला जात आहे. अवघ्या 10 दिवसांत ‘धुरंधर’ने 550 कोटी रुपयांची कमाई केली आहे. चित्रपटाची हिंदुस्थानातील एकूण कमाई 364.60 कोटी रुपये आहे. विपेंडला या चित्रपटाने जबरदस्त गल्ला जमवला. दुसरा शनिवारी आणि रविवारी रेकॉर्डब्रेक कमाई करण्यात चित्रपटाला यश आले आहे.




























































