
गेली आठ दशके बॉलीवूडच्या अनेक चित्रपटांचा साक्षीदार असलेला गोरेगाव येथील प्रसिद्ध फिल्मिस्तान स्टुडिओ आता इतिहासजमा होणार आहे. या स्टुडिओच्या जागी आता गगनचुंबी इमारती उभ्या राहणार आहेत.
गोरेगाव पश्चिमेला एस.व्ही. रोडवर असलेला फिल्मिस्तान स्टुडिओ चार एकर जागेवर वसलेला आहे. 82 वर्षे जुना हा स्टुडिओ एका प्रसिद्ध रियल एस्टेट कंपनीने 183 कोटी रुपयांना खरेदी केला आहे. या स्टुडिओच्या जागी आता 50 मजली दोन गगनचुंबी इमारती उभ्या राहणार असून यात सर्व सोयीसुविधांनी सुसज्ज घरे असणार आहेत. पुढच्या वर्षी या कामाला सुरुवात होणार आहे.
हिंदी चित्रपटसृष्टीत फिल्मिस्तान स्टुडिओचे मोलाचे योगदान आहे. अनेक गाजलेले चित्रपट, मालिका आणि रिऍलिटी शोचे शूटिंग येथे झाले आहे. या स्टुडिओत सात शूटिंग फ्लोअर, एक शिव मंदिर, गार्डन आणि जेलचा सेट आहे.