
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी मृत्यूच्या चार दिवस आधी म्हणजे 24 जानेवारी रोजी एक व्हिडीओ तयार केला होता. ‘देवगिरी’ निवासस्थानी ध्वनीचित्रमुद्रित केलेला हा व्हिडीओ अजित पवार गटाकडून प्रसारित करण्यात आला आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात असताना अजित पवार गटाकडून आज अजित दादांचा व्हिडीओ प्रसारित केला. या व्हिडिओच्या माध्यमातून पवार यांनी ग्रामीण विकास, शेतकरी, महिलांचे सक्षमीकरण, तरुणांचे रोजगार आणि मूलभूत सुविधांवर भर देत मतदारांना आवाहन केले आहे. त्याशिवाय आपल्या गावाचा, तालुक्याचा आणि जिह्याचा सर्वांगीण विकास कोणाच्या हातात द्यायचा, ग्रामीण भागाचा विकास, शेतकरी, महिला सक्षमीकरण, रोजगार, तरुण, शेती, आधुनिक तंत्रज्ञान, एआय, डिजिटल साधने अशा विविध विषयांवर अजित पवार यांनी भाष्य केले आहे.



























































