अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करा,मागील सत्रांच्या गुणांवरून निकाल लावा! यूजीसीच्या विशेष समितीची शिफारस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशातील उच्च शिक्षण संस्थांमधील विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याची शिफारस विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) समितीने केली आहे. या विद्यार्थ्यांचे अंतिम वर्षाचे निकाल त्यांच्या मागील सत्रांतील परीक्षांच्या गुणांवरून लाकण्यात यावेत असेही समितीने सांगितले आहे. हा महाराष्ट्र सरकारचा विजय असून महाराष्ट्र सरकारने चार दिवसांपूर्वीच अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेऊन लाखो विद्यार्थ्यांना दिलासा दिला होता.

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा घेतल्या गेल्या तर देशातील लाखो विद्यार्थ्यांना संसर्गाची शक्यता होती. त्यामुळे उच्च शिक्षण संस्थांमधील अंतिम परीक्षेसह अनेक परीक्षा प्रलंबित राहिल्या. त्याबाबत निर्णय घेण्यासाठी यूजीसीने ही समिती स्थापन केली होती. हरियाणा विद्यापीठाचे कुलगुरू आर. सी. कुहाड हे या समितीचे अध्यक्ष होते.

ऑक्टोबरपासून महाविद्यालये सुरू करा

नवे शैक्षणिक वर्ष सुरू करण्याबाबतही या समितीने काही शिफारशी केल्या आहेत. जुन्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सत्र जुलैमध्ये तर नव्या विद्यार्थ्यांसाठी ऑगस्टमध्ये सुरू करण्यात येणार होते. ते ऑक्टोबरपासून सुरू करण्यात यावे अशी शिफारस समितीने केली आहे. परीक्षेस इच्छुक विद्यार्थ्यांना

कोरोना संपेपर्यंत थांबावे लागणार

मागील सत्रांच्या परीक्षांमधील गुणांवरून अंतिम परीक्षेचा निकाल लावण्याबद्दल विद्यार्थ्यांना आक्षेप असेल तर त्यांच्या परीक्षा कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर घेण्यात येतील असेही समितीने सांगितले आहे. समितीच्या शिफारशीवरून यूजीसीकडून लककरच विद्यापीठे आणि उच्च शिक्षण संस्थांसाठी सूचना दिल्या जाणार आहेत.