
शेअर बाजारातील लाखो गुंतवणूकदारांसाठी शुक्रवारचा दिवस अखेरच्या क्षणी लाभदायी ठरला. शुक्रवारी सकाळी तिसऱ्या सेशनमध्ये शेअर बाजार घसरणीने उघडला. पुढील एक तास घसरणीने व्यापार सुरू राहिला, परंतु दुपारनंतर शेअर मार्केट हळूहळू सुधारत गेले आणि शेवटच्या क्षणी शेअर बाजार सपाट बंद झाला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 95 अंकांनी घसरून 83,216 अंकांवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी केवळ 17 अंकांनी घसरून 25,491 अंकांवर बंद झाला. लार्ज कॅपच्या तुलनेत मिडकॅपच्या स्टॉक्समध्ये जास्त खरेदी दिसली. श्रीराम फायनान्सचे शेअर्स सर्वात जास्त वधारले. बजाज फायनान्समध्येही 3 टक्के वाढ पाहायला मिळाली. बजाज फायनान्स, टाटा स्टील, बजाज फिनसर्व, महिंद्रा अँड महिंद्रा, आयसीआयसीआय बँक, बीईएल, अदानी पोर्टस्, इन्फोसिस, पॉवर ग्रीड, एशियन पेंट्स, सन फार्मा, कोटक महिंद्रा बँक, मारुती सुझुकी, एसबीआय लाइफ आणि एलआयसीच्या शेअर्समध्ये वाढ दिसली, तर भारती एअरटेलचे शेअर्स 4.46 टक्के घसरले. ट्रेंट, रिलायन्स इंडस्ट्रीज, एचसीएल टेक, हिंदुस्थान युनिलीवर आणि आयटीसीचे शेअर्स घसरले.
गॅरंटको-मुथूट बाँड
z गॅरंटकोने मुथूट कॅपिटल सर्व्हिसेस लिमिटेडने बिगर बँकिंग वित्तीय संस्थेच्या 1.5 अब्ज रुपये मूल्याच्या सूचिबद्ध ग्रीन बाँड इश्यूंसाठी 65 टक्के अंशतः हमी दिली आहे. हे बाँड ‘नॅशनल स्टॉक एक्स्चेंज’वर सूचिबद्ध झाले आहेत.
ऍरोकेम रतलामचे ऍरबिक अत्तर बाजारात
z ऍरोकेम रतलाम प्रा. लि. ने करीम, जाफिर प्रीमियम ऍरबिक अत्तर बाजारात आणले आहे. हे अत्तर 9 मिलीमध्ये उपलब्ध आहे. हे अत्तर घरात किंवा कारमध्ये वापरता येईल. हे अत्तर सर्व मेडिकल, स्टोअर्स आणि दुकानात उपलब्ध आहे. अगरबत्ती व परफ्युमचा उद्योग करण्यास इच्छुक व्यक्तींनी कंपनीकडे संपर्क करावा. संपर्क – 07412-236226
महाराजाची पानडी आणि हीना अगरबत्ती बाजारात
z महाराजा अगरबत्तीची पानडी आणि हीना प्युअर ब्रँडची अगरबत्ती बाजारात आली आहे. ही अगरबत्ती 50 ग्रॅम, 100 ग्रॅम आणि 250 ग्रॅमच्या पॅकिंगमध्ये उपलब्ध आहे. तसेच केसरिया ऊद, केसरिया चंदन, मिस्टिक रोझस टॅपल ब्लिस, रॉयल ऊद, हीना, पानडी, सुखद सँडल, पल्सर, बेला, कॉन्फिडंट, ड्रीम, लव्हेंडर, सँडलवुड, स्वामी, ग्रीन मस्क, कश्मिरी लव्हेंडर, अंगारे ऊद, कस्तुरी आणि अनमोल अशा विविध प्रकारांच्या सुगंधी अगरबत्त्या महाराजा अगरबत्ती, रघुनाथ निवास, डी. व्ही. देशपांडे मार्ग, शिवाजी पार्क रोड क्रमांक 4, दादर येथे उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी 8369185071 वर संपर्क साधा.
गुंतवणुकीसाठी वेस्टेडचे 50 हून अधिक फंड
z वेस्टेड फायनान्स या भारतीयांसाठी जागतिक गुंतवणूक विशेषज्ञ कंपनीने आज ग्लोबल फंड्सच्या लाँचची घोषणा केली. भारतीय गुंतवणूकदारांसाठी डीएसपी, ब्लॅकरॉक, वॅनगार्ड, पीआयएमसीओ, फ्रँकलिन टेम्प्लटन आणि मॉर्गन स्टॅण्ली यांसारख्या प्रसिद्ध कंपन्यांद्वारे व्यवस्थापित 50 हून अधिक आंतरराष्ट्रीय फंड्समध्ये प्रत्यक्ष गुंतवणूक करण्याचा मार्ग आहे. ग्लोबल फंड्ससह गुंतवणूकदारांना फिडेलिटी, पीआयएमसीओ व ब्लॅकरॉक अशा काही मालमत्ता व्यवस्थापन कंपन्यांकडून फंड मिळवण्यामध्ये येणारे अडथळे दूर करत आहोत, असे वेस्टेड फायनान्सचे संस्थापक विराम शाह म्हणाले.


























































