बेकायदेशीरपणे राहिल्याप्रकरणी तेलंगाणात 17 रोहिंग्यांविरोधात गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तेलंगाणात 17 रोहिंग्या मुस्लिमांवर गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. सर्व रोहिंगे बेकायदेशीरपणे राज्यात राहत होते. तसेच प्रार्थनेचे आयोजन करून गर्दी जमवत होते. राज्य सरकारने या प्रकरणी 17 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.  केंद्रीय गृहमंत्रालायने राज्य सरकारांना रोहिंग्या मुस्लिमांचा तपास करण्याचे आदेश दिले होते. अनेक रोहिंगे तबलिगी जमातमध्ये सामील झाले होते. त्यानुसार शुक्रवारी राज्य सरकारने 17 रोहिंग्यांविरोधात कारवाई केली.

दिल्लीतील शरम विहार आणि शाहीन बागमधे राहणारे रोहिंग्यांनी तबलिगी जमातच्या कार्यक्रमात हजेरी लावली होत्ती. पंजाबच्या डेराबसी आणि जम्मूमध्येही हे रोहिंगे असून त्यांनी तबलिगीमध्ये सामील झाले होते. तबलिगी जमातच्या संपर्कात जे रोहिंगे आले होते त्यांची तपासणी करण्याचे आदेश केंद्रीय गृहमंत्रालयाने दिले होते. मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार दिल्ली, जम्मू, हैदराबाद आणि देशातील इतर भागात एकूण 40 हजार रोहिंग्या निर्वासित आहेत. गेल्या महिन्यात निजामुद्दीनहून जम्मूमध्ये परतलेले 8 रोहिंग्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते.